अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर ‘D-कंपनी’त प्रचंड ‘दहशत’ ; दाऊद इब्राहिमची ‘भंबेरी’ उडाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. मोदींची सत्ता पुन्हा आल्याने भारतातील पक्षांना धक्के तर बसलेच त्यासोबत पाकिस्तानमध्ये लपलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर अनेक दहशतवादी संघटना घाबलेल्या आहेत. त्यात मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्रीपदावर अमित शहा यांच्या येण्याने या दहशतवाद्यांची पुरती कोंडी झाली आहे. डी कंपनी आणि त्यांच्या गुंडांना अमित शहांची भिती वाटायला लागली आहे. कारण देशाच्या गृहमंत्रीपदावर अमित शहा आल्याने गृह मंत्रालयात धूळ खात पडलेल्या जुन्या केसेसच्या फाईल पुन्हा उघडल्या जातील. तंसच त्यावर जोरदार आणि लवकर करवाई केली जाईल, अशी माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली आहे.

ऐकेकाळी भारतातील अंडरवर्ल्डमध्ये डी कंपनीची दहशत असायची आता तीच कंपनी मोदी आणि शाहांच्या येण्याने घाबलेली आहे. दाऊदचे जवळचा छोटा शकील याने नुकतीच अज्ञात ठिकाणावर मोठमोठ्या गुंडांची बैठक बोलवली. यात इंटरनेट कॉन्फ्रेंसद्वारे लांब असलेल्या गुंडांशीही संवाद साधला, अशी माहिती आहे. तसंच आपल्या पुढील कारवाया करण्यासाठी डी कंपनी अधिक सावधानतेने पाऊले उचलत आहे.

झालेल्या बैठकीत दाऊदने आपल्या गुंडांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तर छोटा शकीलने त्याच्या भारतातील गुंडांनाही अधिक सावधान होण्यास सांगितलं आहे. खंडणी, ड्रग्स, फेक करंसी, बेटींग, अवैध हत्यार हे कारभार संभाळणाऱ्या गुंडांनाही सांगण्यात आले आहे, की कुठेही चुकीच काही वाटलं, आणि धोका वाटला तर भारत सोडून बांग्लादेश, थाईलँड, इंडोनेशिया आणि दुबई अशा देशात जावा. जेथे डी कंपनी सुरक्षित राहिल.

भारतात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर दाऊदने आयएसआय आणि पाकिस्तानी मिलेट्रीच्या अधिकाऱ्यांशी स्वतःच्या सुरक्षतेबाबत संवाद केल्याची माहिती आहे.

दरम्यान, सध्या नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अजित डोवाल हे मसूद अजहरनंतर आता हाफिज सईद आणि दाऊद विरोधात कोणती रणनीती करतात आणि त्यांच्यावर कशी कारवाई करतात ते पाहणे महत्त्वाचे आहे.