अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू? ‘त्या’ वृत्ताबाबत दिल्लीच्या AIIMS च्या अधिकार्‍यांचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनचा कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला असे वृत्त समोर आले होते. मात्र, एएनआयनं AIIMS च्या अधिकार्‍यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तामध्ये छोटा राजन जिवंत असल्याचं सांगितलं आहे.  26 एप्रिलपासून दिल्लीच्या AIIMS रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान शुक्रवारी राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनचा मृत्यू झाला असे वृत्त समोर आले होते. पण, एएनआयनं त्याबाबत रूग्णालयाच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने छोटा राजन जिवंत असल्याचं सांगितलं आहे. छोटा राजनला तिहार जेलमध्ये मोठया संरक्षणात ठेवण्यात आले होते. त्याला इंडोनेशियामधील बाली येथून सन 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.

गेल्या 2 दिवसांपासून छोटा राजनवर अति दक्षता विभागात (आयसीयु) उपचार चालू होते. छोटा राजनवर एकुण 70 गुन्हे दाखल होते. त्यामध्ये खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि अपहरण अशा गंभीर गुन्हयांचा समावेश आहे.