छोटा राजन जिवंत ! ‘त्या’ वृत्तानंतर AIIMS कडून खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीतील तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेनं छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सर्व्हिसेसमध्ये (AIIMS) छोटा राजनवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी प्रसारमाध्यमांमध्ये छोटा राजनच्या मृत्यूची बातमी आली होती. त्यानंतर काही वेळातच एनएनआयनं एक्समधील सुत्रांच्या आधारे छोटा राजन जिवंत असल्याचं सांगितलं आहे.