दाऊद साठी मोठा धक्का ! छोटा शकीलच्या भावाला अटक 

दुबई : वृत्तसंस्था – भारतात हि दाऊद हा विषय धरून चांगलंच वातावरण तापलं आहे सूत्रानुसार दाऊदची मुंबई आणि रत्नागिरी इथे एकूण ७६ आलिशान बंगले आहेत त्यापैकी मुंबईतील एक बंगाल आणि हॉटेल गेल्या वेळेसच सील केलं उर्वरित संपत्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून लवकरच जमा करतील
 छोटा शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्टही सापडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी हा एक मोठा  झटका मानला जात आहे. छोटा शकील अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमचा जुना आणि विश्वासू साथीदार आहे. अनवरला अबू धाबी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आता त्याच्या प्रत्यार्पणावरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. भारतात हि दाऊद हा विषय धरून चांगलंच वातावरण तापलं आहे सूत्रानुसार दाऊद ची मुंबई आणि रत्नागिरी इथे एकूण ७६ आलिशान बंगले आहेत त्यापैकी मुंबईतील एक बंगाल आणि हॉटेल गेल्या वेळेसच सील केलं उर्वरित संपत्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून लवकरच जमा करतील
अबूधाबीमधील भारतीय दूतावास अनवरचा ताबा मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्याचवेळी पाकिस्तानकडूनही अनवरला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनवरकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याने त्याला आमच्या ताब्यात द्या असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अबूधाबीमधील अधिकाऱ्यांनी ठोस माहितीच्या आधारावर अनवर बाबूला अटक केली.
अनवरच्या विरोधात आधीपासूनच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत काम करत असून भारताविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. छोटा शकीलचे मूळ नाव शकील बाबूमिया शेख असे आहे. १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील तो एक आरोपी आहे.
छोटा शकील डी कंपनीसाठी शस्त्रास्त्र तस्करी, खंडणी वसुलीचे काम करतो. छोटा राजनने दाऊदची साथ सोडल्यानंतर छोटा शकीलने अनेकदा राजनवर हल्ल्याचा प्रयत्न केला. छोटा राजनच्या अटकेनंतर जेलमध्ये घुसून छोटा राजनची हत्या करण्याची त्याने धमकी दिली होती. त्यानंतर राजनच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा मौलाना झाल्यानंतर आता दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर निघाल्याचे वृत्त होते. लवकरच भारत सरकार दाऊद आणि त्याच्या टोळीला अटक करेल असं चिन्ह दिसतायत