अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू, एका महिन्यात 2 बहिणींचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला एका महिन्यातच दुसरा मोठा धक्का बसला आहे. छोटा शकीलची मोठी बहीण हमीदाचा मृत्यू झाला आहे. हमीदा महाराष्ट्रातील ठाण्यात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून तिची तब्येत खराब होती.

दरम्यान, यापूर्वीच मे महिन्यात छोटा शकीलची आणखी एक बहीण फहमिदाचा ( 50) मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने फहमीदाचा मुंबईत मृत्यू झाला. दरम्यान, छोटा शकील हा दाऊद इब्राहिमचा उजवा हात असल्याचे मानले जाते. तो पाकिस्तानात कराची येथे आपल्या कुटूंबासह राहत असल्याचे समजते. त्याचा भाऊ अनवरही पाकिस्तानात राहतो.

छोटा शकीलची बहीण फहमिदा पूर्वी दुबईत राहत होती. 2006 मध्ये ती मुंबईत शिफ्ट झाली. मिळालेल्या माहितीनुसार, फहमीदा ही छोटा शकीलच्या सर्वात प्रिय बहिणींपैकी एक होती. चार भावंडांपैकी ती सर्वात धाकटी होती. 2011 मध्ये शकीलचे वडील बाबुमिया शेख यांचे जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. हे कुटुंब दक्षिण मुंबईतील टँकर मोहल्ला भागातील इस्माईल बिल्डिंगमध्ये राहत होते.