केरळ सोनं तस्करी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि D कंपनीचा हात असल्याचा NIA ला संशय

कोची : वृत्तांस्था – केरळ सोन्याच्या प्रकरणातील दहशतवादी कनेक्शनची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.NIA ने म्हटले आहे की, सोन्याच्या तस्करीतून मिळणारा नफा देशविरोधी विघातक कार्यांशी संबंधित असलेल्या गुप्तचर आणि दहशतवादी कारवायांच्या संभाव्यतेसाठी वापरण्यात येत असतो.

एनआयएने सांगितले कि या प्रकरणातील चौकशीसाठी सर्व आरोपींना १० दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवणे अत्यंत आवश्यक असते. NIAकडून सर्व आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. NIA ने म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपीने अनेक वेळा टांझानियाला भेट दिली आहे. केरळ मधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील आरोपी रमीस याने अनेक वेळा टांझानियाला जाऊन अनेक वेळा हिरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न अशी माहिती NIAकडून देण्यात आली आहे. त्याच्याकडून टांझानियात सोन्याच्या खाणीसाठी परवाना मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला होता.त्याने टांझानियामध्ये सोने खरेदी केले आणि ते यूएईला विकले असे सुद्धा कबुल केले आहे. असे NIAकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाची (ईडीची) अटक टाळण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सचिव एम. शिवशंकर यांच्याकडून बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली व अटकपूर्व जामिनासाठी विनंती करण्यात आली. शिवशंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, जबाबदार सरकारी नोकर म्हणून त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये जास्तीत जास्त सहकार्य केले आहे. ते पुढे म्हणाले ईडीकडून त्यांना कित्येकदा समन्स बजाववण्यात आले होते. तसेच गेल्या एका महिन्यात ९० तासांहून अधिक वेगवेगळ्या एजन्सीद्वारे यांची चौकशी करण्यात येत आहे. परंतु कोणत्याही तपास यंत्रणेनेकडून त्यांच्याविरूद्धचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला नाही. मीडिया ट्रायलमुळे तपास यंत्रणेवर अत्यधिक दबाव होता, अशी मला भीती आहे असे एम. शिवशंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हणले आहे.