Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद इब्राहिम’ला ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याला आणि त्याची पत्नी यांना कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे खरी आहे आणि दाऊद आणि त्याच्या पत्नीला मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दाऊद इब्राहिम हा बराच काळ पाकिस्तानात आपल्या कुटूंबासह लपून राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा ठाम पुरावाही भारताने दिला आहे, असे असूनही पाकिस्तान हे मान्य करण्यास नकार देत आहे. दरम्यान मिळालेली माहिती अशी की दाऊद इब्राहिमच्या घरी आता कोरोना विषाणूने अंग पसारले आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. दाऊद इब्राहिम आणि पत्नी महजबीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घरात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दाऊद इब्राहिम कोण आहे ?
दाऊद इब्राहिम हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. दाऊद 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड होता आणि तो अंडरवर्ल्ड डॉन आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु फारच कमी लोकांना त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे. कारण दाऊदने नेहमीच त्याच्या कुटुंबाला लोकांपासून लांब ठेवले आहे. दाऊदच्या पत्नीचे नाव महजबीन उर्फ झुबिना जरीन आहे. दाऊद आणि झुबिना यांना चार मुले आहेत. महरूख, माहरीन आणि मारिया या तीन मुली तर मोईन नावाचा एक मुलगा दाऊदला आहे.