अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘बर्थडे’चं मुंबईत ‘सेलिब्रेशन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई यांचे एक खास नाते आहे. मागील अनेक वर्षे तो पाकिस्तानमध्ये दडून बसलेला असला तरी त्याचे पंटर लोक मुंबईत आपल्या कारवया करत असतात. पोलिसांच्या दट्ट्यामुळे त्यांच्या कारवायांना आळा बसलाय. मात्र, पडद्याआडून या कारवाया सुरुच असतात. 26 डिसेंबरला दाऊदचा जन्मदिवस असतो. मुंबईतल्या डोंगरी भागात दाऊदचा वाढदिवस साजरा झाल्याने खळबळ उडाली आहे. या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतल्याचे वृत्त एका राष्ट्रीय चॅनलच्या बेवसाइटवर देण्यात आले आहे.

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर दाऊत भारता बाहेर पळून गेला. तो अनेक देशांमध्ये राहिल्यानंतर पाकिस्तानात दडून बसलाय. मात्र त्याच्या भारताविरुद्धच्या कारवाया मात्र अजुनही थांबलेल्या नाहीत. फेसबुकवर शेरा चिकना या नावाने असणाऱ्या एका अकाऊंटवरून दाऊदच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांमध्येच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनेकांनी या फोटोवरून मुंबई पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केलीय. सोशल मीडियावरच्या या गदारोळानंतर मुंबई पोलिसांनी त्याची गंभीर घेतल्याचे वृत्त एका राष्ट्रीय चॅनलच्या बेवसाईटवर देण्यात आले आहे.

संबंधीत खातेदाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. डोंगरीच्या घरात यासंबंधीची पार्टी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलीय. देशाचा शत्रू आणि दहशतवादी असलेल्या माणसाच अशा प्रकारे उदात्तीकरण होणं योग्य नसल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केलीय. हा उद्योग करणाऱ्याचा सायबर सेलकडून कसून शोध सुरु केलाय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/