अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा 1 डिसेंबरला लिलाव !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लोटे येथे पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचा एक डिसेंबरला लिलाव होणार आहे त्यानुसार मग स्मगलिंग अँण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जागेची पाहणी केली. कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील सहा वडिलोपार्जित मालमत्तांच्या लिलावा करण्यात आला आहे. या लिलावाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंबकेतील दाऊदच्या ६ मालमत्तांची लिलाव प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. दाऊदच्या दुमजली बंगला दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी अकरा लाख तीस हजाराची बोली लावून विकत घेतला. शिवाय १५३ सर्वे व क्रमांकाची मालमत्ता चार लाख तीन हजार रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर चार मालमत्ता सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सात लाख १८ हजार रुपयांना खरेदी केल्या होत्या.

लोटे येथे तीस गुंठे क्षेत्रात असलेल्या एक डिसेंबरला होणार आहे. दाऊदने हा भूखंड पेट्रोल पंपासाठी खरेदी केला होता, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. या भूखंडाचा लिलाव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्मगलिंग अँण्ड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेशन व केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बोलीधारकांसह भूखंडाची पाहणी केली.