फडणवीस CM असताना ‘अंडरवर्ल्ड’ डॉन त्यांना ‘वर्षा’वर भेटला, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन वाद उफळला आहे. राऊतांनी आपले वक्तव्य मागे घेतले परंतु वाद निवळला नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. फारसा प्रसिद्ध नसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन फडणवीस यांना भेटायला वर्षावर आला होता असा आरोप केला आहे. एवढेच नाही तर मुन्ना यादव या अट्टल गुन्हेगाराला देखील त्यांनी वाचवले आहे. आणि सरकरी पद देखील दिलं असा आरोपही थोरातांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत असा ही आरोप केला आहे की एक फारसा प्रसिद्ध नसलेला डॉन वर्षावर फडणवीस मुख्यमंत्री असताना भेटायला जात होता. तर दुसरा गुन्हेगार मुन्ना यादव याला तर एका सरकारी कमेटीवर घेतले होते असा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे.

थोरातांच्या आरोपंना फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मी कधीही गुन्हेगारांना संरक्षण दिलेले नाही. मुन्ना यादव हे नागपुरातून तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे जो वाद निर्माण झाला त्यापासून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करु नका.

सांगली बंद –
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानाच्या वतीनं उद्या (दि 17 जानेवारी) सांगली बंदचं आव्हन करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं हा बंद पुकारण्यात आला आहे. उद्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सांगलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. असं असताना उद्याच सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जाताना दिसत आहे.

संजय राऊतांच्या विधानाचा निषेध करताना संभाजी भिडे म्हणाले, संजय राऊत यांचं वक्तव्य अपमानास्पद आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी देशाचाच नाही तर छत्रपतींच्या परंपेरचा अपमान केला आहे. यामुळे उद्या (दि 17 जानेवारी) सांगली जिल्हा बंद असेल. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. उदयनराजेंचा अपमान करणाऱ्या आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदावरून हटवावं. अन्यथा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही असाच बंद केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like