‘वीराना’ सिनेमतील ‘या’ ‘हॉट’ अभिनेत्रीवर फिदा होता अंडरवर्ल्ड ‘डॉन’, भीतीपोटी झाली गायब

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील सिनेमा वीराना हा सर्वांनाचा आठवत असेल. या सिनेमात जी सुंदर अभिनेत्री दिसली तिला लोकांचं खूप प्रेम मिळालं होतं. परंतु नंतर ही अभिनेत्री रातोरात गायब झाली. अनेकांना यामागील कारण माहिती नसेल. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या सुंदर अभिनेत्रीचं नाव होतं जास्मीन. जास्मीननं वीराना सिनेमानंतर अनेर हॉरर सिनेमात काम केलं. आज ही अभिनेत्री कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. असं सांगितलं जात आहे की, अंडरवर्ल्ड डॉन तिच्यावर फिदा झाला होता. तिल रोज अंडरवर्ल्डमधून कॉल येत होते. असंही म्हटलं जात आहे की, जास्मीन या गोष्टीनं खूप वैतागली होती. इतकी की, भारत सोडून ती गायब झाली. सध्या तिची काहीच माहिती नाही.

अनेक लोक असे सांगत आहेत जास्मीन लग्न करून परदेशात रहात आहे. काही तर म्हणत आहेत की ती या जगात नाही. तिचं सोशलवरही कोणतं अकाऊंट नाही. त्यामुळं तिच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.

जास्मीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वीराना या सिनेमानंतर तिनं अनेक हॉरर सिनेमात काम केलं आहे. बंद दरवाजा, डाक बंगला, पुरानी हवेली असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.