MP : 200 काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, कमलनाथ म्हणाले – ‘सोशल डिस्टन्सिंग कुठेय ?’

भोपाळ : मध्यप्रदेशच्या सांची विधानसभा मतदारसंघातील 200 पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रदेश भाजपा अध्यक्ष व्ही. डी. शर्मा सुद्धा उपस्थित होते. काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेले सिंधिया समर्थक प्रभुराम चौधरी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिला आहे.

भाजपामध्ये येणारे मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, यूथ काँग्रेस अध्यक्षासह सरपंच आणि प्रमुख कार्यकर्ते यांचा सहभाग होता. भोपाळच्या राज्य भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

यारदम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मध्यप्रदेशाला वाचवण्यासाठी त्यागाचे सर्वात चांगले उदाहरण डॉ. प्रभुराम चौधरी यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी मंत्री पद सोडून सत्याची साथ दिली. ते म्हणाले, मध्यप्रदेशमध्ये मोठ्याप्रमाणात परिवर्तन झाले आहे. जनतेच्या भल्यासाठी सिंधियाजी आणि त्यांचे समर्थक आमदारांनी त्यागाचे उदाहरण दिले आहे.

राज्य भाजपा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होत. यावरून काँग्रेसने भाजपा नेत्यांवर सोशल डिस्टन्सिंगच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कार्यक्रमाचा फोटो ट्विट करत आरोप केला की, शिवराजजी काल कोरोनाचा आढावा घेताना तुम्ही राज्यातील जनतेला सक्त ताकिद देत होतात. राज्यातील जनतेला लग्न असो की, दुख, लॉकडाऊनमध्ये एकत्र येण्यासाठी संख्या ठरलेली आहे. सर्व जनता नियमाचे पालन सुद्धा करत आहे. तुम्हीच नियमांचे पालन करत नाही. नियमांचे उल्लंघन करणार्‍या या लोकांवर कारवाई व्हावी.

भाजपा कार्यालयात लॉकडाऊनमध्ये तुमच्या आणि इतर जबाबदार भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत गर्दीचा कार्यक्रम आयोजित कला जातो, नियम पायदळी तुडवण्यात येतात, सोशल डिस्टन्सिंगचे थोडेतरी पालन झाले का? यापूर्वी सुद्धा असे अनेकदा झाले आहे. मोदीजींचे लॉकडाऊनचे नियम फक्त आम जनतेसाठी आहेत का? तुमच्या पार्टीच्या नेत्यांना हे नियम लागू नाहीत का? या दोषींवर आम जनतेप्रमाणे कारवाई होईल का?, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले आहेत.