Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात मेफेड्रोन (Mephedrone), गांजा (Marijuana), चरससह (Hashish) इतर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने (Anti Narcotics Cell) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 11 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) वानवडी भागात शुक्रवारी (दि.17) करण्यात आली.

लायनल लेझली मेस्करेनस (वय-33), रसल अॅन्थोनी रोनॉल्ड चंदनशिव (वय-21 दोघे रा. गंगासवेरा अपार्टमेंट, वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. या दरम्यान वानवडी भागात दोनजण वेगवेगळे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार साहिल शेख व अझीम शेख यांना मिळाली. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वानवडी परिसरत आरोपींचा शोध घतेला असता महात्मा फुले सांस्कृतीक भवन येथील सार्वजनिक रोडवर दोनजण लाल रंगाच्या मोपेडवर बसल्याचे आढळून आले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची व मोपोडची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे गांजा, चरस, मेफेड्रोन व इतर अंमली पदार्थ आढळून आले. त्यांच्याकडून अंमली पदार्थ, दुचाकी, मोबाईल असा एकूण 11 लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Add CP Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे
(Police Inspector Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण
(PSI Digambar Chavan) पोलीस अंमलदार साहिल शेख, अझीम शेख,
संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड,
रविंद्र रोकडे, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझीम शेख, नितीन जगदाळे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Crime branch arrested two people who
came to sell mephedrone, hashish, seized goods worth 12 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘… तेव्हा मी फक्त दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केला’, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Chandrakant Patil | संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – चंद्रकांत पाटील