Pune Crime | दुर्दैवी ! स्विमिंग पूल बाहेर येताच ओल्या अंगाचा लाईटच्या खांबाला स्पर्श, लोणावळ्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) पोहण्याचा आनंद लुटून बाहेर आल्यानंतर एका 13 वर्षाच्या मुलावर काळाने घाला घातला आहे. ओल्या अंगाने तलावाच्या कडेला असलेल्या लाईटला स्पर्श झाल्याने मुंबई येथील मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Child Death) झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंट बंगल्याच्या (Crescent Bungalow Tungarli) जलतरण तलावात घडली. मागील 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे लोणावळ्यातील जलतरण तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर (Pune Crime) आला आहे.

 

हरुन मसुद वाली Harun Masood Wali (वय – 13 रा. भायखळा, मुंबई – Mumbai) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मोहमद साजीद खान Mohammad Sajid Khan (वय – 56 रा. भायखळा, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station) खबर दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमद खान आणि त्यांचे नातेवाईक हे लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंट व्हिला या बंगल्यात गुरुवारी दुपारी आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास खान हे त्यांच्या बहिणींच्या मुलांसोबत बंगल्यातील जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेत होते. ते मुलांसोबत पाण्यात खेळत होते. त्यावेळी हरुन खेळता खेळता जलतरण तलावाच्या पाण्याच्या बाहेर गेला. बाजूला असलेल्या एका विजेच्या खांबाला त्याने पकडले.

हरून याला विजेचा जोरात धक्का बसल्याने तो मोठ्याने ओरडला. नातेवाईकांनी त्याला बाजूला केले.
मात्र तो बेशुद्ध झाल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

दरम्यान, तुंगार्ली परिसरातील बंगल्यातील जलतरण तलावात घडलेली ही 15 दिवसांतील दुसरी घटना आहे.
13 जुलै रोजी याच परिसरात एका दोन वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
त्यानंतर गुरुवारी दुसरी घटना घडली आहे.
यामुळे लोणावळा शहर आणि परिसरातील खाजगी बंगल्यात असलेल्या जलतरण तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

Web Title : – Pune Crime | swimming pool death 13 years old boy dies of electric shock after touching light with wet hands maharashtra pune lonavala crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा