अमेरिकेमध्ये ‘कोरोना’मुळे हाहाकार ! आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचं संकट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना विषाणूमुळे जगभरात बेरोजगारीची तलवार अनेक नोकरदारांवर पडणार असल्याचे चित्र आहे. बलाढ्य अमेरिकेमध्ये मागील आठवडाभरात तब्बल 1.3 दशलक्ष लोकांनी पहिल्यांदाच बेरोजगार म्हणून नोंदणी केली. अमेरिकेच्या कामगार विभागाने ही चिंतेत टाकणारी आकडेवारी जाहीर केली. त्याआधी या आकड्यामध्ये काही प्रमाणात घट झाली होती.

अमेरिकेत मार्चच्या मध्यावर कोरोना विषाणूने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेमध्ये लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा सुमारे दहा लाखांच्या जवळ होता. मागील चार आठवड्यामध्ये सरासरी 1.4 दशलक्ष लोक बेरोजगार होत होते. याची नोंद ते सरकारकडे वेळोवेळी करत होते. या व्यतिरिक्त आणखी एक दशलक्ष लोकांना कोरोनाच्या महामारीमध्ये कामगार, स्वयंरोजगार आणि कंत्राटे देऊन मदत केली आहे. ही मदत बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेतून दिली आहे. ही आकडेवारी एकत्र केल्यास गेल्या तीन आठवड्यांमध्ये हा आकडा जूनच्या मध्यावर असताना 2.24 वरून 2.44वर गेलाय.

जुलैमध्ये काही दिवसांतच अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका जाणवू लागला आहे. रुग्ण वाढू लागल्याने देशभरात कडक नियम लागू केले. तरीही काही कामगारांना पुन्हा नोकरी गमवावी लागली. यामुळे हे कामगार पुन्हा बेरोजगारी विम्याच्या रांगेत दुसऱ्यांदा दिसत आहेत.

आधीचे दावे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की, ते अर्थव्यवस्थेवरील संकट वाढत असल्याचे दर्शवत आहेत, असे अपवर्कचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम ओझिमेक यांनी सांगितले आहे. आठवड्यांच्या बेरोजगारीच्या दाव्यांपेक्षा स्वतंत्र दाव्यांचा दर हा दोन महिन्यांपेक्षा खाली गेलाय.

जूनमध्ये हा दर ११.१ टक्क्यांपर्यंत खाली आला. कारण, अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा आणि अन्य काही महत्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना पुन्हा कामावर बोलावले होते. यामुळे अद्याप नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही.