बेरोजगारी देशातील प्रमुख समस्या : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच वर्षांमध्ये हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम फॉर्च्युन फाउंडेशनने केले आणि आजही करीत आहेत. बेरोजगारी देशातील प्रमुख समस्या असून, नोकऱ्या देण्यावर मर्यादा आहेत. रोजगार कसे निर्माण होतील, यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या विशेष लक्ष देण्यामुळे मिहानमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. सध्या विदर्भातील मिहानमध्ये ५० हजार रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी २७ हजार तरुणांना रोजगार दिला आहे. येत्या वर्षात ५० हजार युवकांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांची वाढ करताना रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यातून विकासाचा वेग प्रचंड वाढत आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असला तरी रोजगार देणारे व्हा, असे आवाहन गडकरी यांनी युवकांना केले.