बेरोजगारीचा प्रश्न सुटणार : रामदास आठवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – बेरोजगारीची समस्या जाणवत आहे. अधुनिक यंत्रांमुळे मनुष्यबळ कमी होत आहे, हे मान्य करावेच लागेल. परंतु रोजगार वाढवा यासाठी स्टार्टअप आणि मुद्रा योजने अंतर्गत लाखो युवकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मोदी यांचे अन्य देशांसोबत चांगले संबंध असून येथील गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना – रिपाइं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, अशोक शिरोळे, परशुराम वाडेकर, मंदार जोशी आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, की अपरिहार्य कारणामुळे रिपाइं चे पाच उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर लढत आहेत. पुण्यात एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. ते पुण्यात रिपाइं चे पालकमंत्री आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी