दुर्देवी ! पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही वेळापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. रावसाहेब भापकर हे पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास होते. सध्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. यापूर्वी ते वानवडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गुन्हे म्हणून होते.

दरम्यान आज त्यांची मॉर्निंग शिप्ट होती. सकाळी ड्युटीवरून ते घरी गेले. अचानक सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची पुणे शहर पोलीस दलातील कारकीर्द उत्तम होती. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात चांगले काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. ते शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे होते. रावसाहेब भापकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील होते. पुण्यात ते सध्या वडगाव शेरी परिसरात राहण्यास होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like