Pune : पहिल्या बर्थडेच्या दिवशीच चिमुकलीचा खेळताना गॅलरीमधून पडल्याने दुर्देवी मृत्यू, नर्‍हेमधील घटना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  घराच्या गॅलरीतून खेळत असताना 1 वर्षाच्या चिमुकल्याचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे. त्याचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. तिचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता.

अद्विका धरतेज गाथाडे (वय 1 वर्ष) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गाथाडे कुटुंबिय नऱ्हे येथील राजवीर हाईट्स इमारतीत पाचव्या मजल्यावर राहते. ते मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. दरम्यान धरतेज हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान बुधवारी अद्विका हिचा वाढदिवस होता. यामुळे घरात धावपळ होती. तिची आई इमारतीमधील सर्वांना वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी गेली होती. तर धरतेज हे बाथरूममध्ये गेले होते. तर अद्विका गॅलरीत खेळत होती. मात्र खेळत खेळत अद्विका गॅलरीतून खाली पडली. हा प्रकार शेजाऱ्यांनी पाहिला आणि त्यांनी धावत येऊन तिला उचलले. पण पाचव्या मजल्यावरून ती खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिचा गुरुवारी मृत्यू झाला. सिंहगड रोड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

आनंदी वातावरणात दुःखाचा डोंगर कोसळला

गाथाडे कुटुंबात अद्विकाचा पहिला वाढदिवस असल्याने आनंदी वातावरण होते. तिच्या वाढदिवसाची जोमाने तयारी सुरू होती. सर्वांना आमंत्रण देखील देण्यात आले होते. नशिबाने आनंदी वातावरण त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यघटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.