दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना

हिंंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेवर रुजू होण्यासाठी (To attend school) जाताना भरधाव कार (car) पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने गुदमरून (Suffocating) चौघा शिक्षकांचा मृत्यू (Death of four teachers ) झाला. हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli district) सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गावर भानखेडा गावाजवळ रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. मृत चौघेही शिक्षक teachers हे लोणार तालुक्यातील आहेत. दिशादर्शक फलक (Directional panel) नसल्याने हा भीषण अपघात Accident झाल्याची माहिती समोर आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृत शिक्षकांची नावे असून अन्य दोघांची नावे समजू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शाळा सुरु होणार असल्याने शाळेवर रुजू होण्यासाठी चौघेही कारने (car) निघाले होते.
त्यावेळी सेनगाव येलदरी राष्ट्रीय महामार्गावर भानखेडा गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खड्ड्यात कार कोसळली.
खड्यातील पाण्यात कार उलटल्याने लॉक झाली.
त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही.
गुदमरून चौघांचाही मृत्यू Death झाला. खड्यात वाहनाची लाईट दिसत असल्याने गावक-यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
त्यावेळी एक कार पाण्यात पडलेली आढळली. ग्रामस्थानी या घटनेची माहिती पोलिसांना Police दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. सेनगाव पोलीस Sengaon Police तपास करत आहेत.
Web Title : Unfortunately Four teachers killed in car crash in Hingoli district
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
भगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव जाणकरांचा VIDEO समोर
महाविकास आघाडीत फूट ? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार
आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्या 4 जणांना पोलिसांनी केली अटक