दुर्देवी ! ISRO च्या 45 वर्षीय इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

चेन्नई : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या एका इंजिनिअरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुगझेंती असं या 45 वर्षीय इंजिनिअरचं नाव आहे. तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या केंद्रात ते नोकरी करत होते. या घटनेनंतर इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत अपघाताची माहिती घेतली. पुगझेंती हे कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावेच रहिवासी होते.

नेमकं काय घडलं ?
पुगझेंती हे दुपारी दुचाकीनं जात असताना त्यांची दुचाकी स्टेशनरी पिकअपवर जाऊन धडकली. पुगझेंती यांनी हेल्मेट घातलं होतं. परंतु हा अपघात फारच भीषण होता. ही धडक एवढी जोरदार होती की यात हेल्मेट घालूनही त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघातानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखलं केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मंगळवारी दुपारी मोराई गावातील आऊटर रोडवर ही घटना घडली.

या घटनेनंतर पिकअप व्हॅनचा चालक असलेल्या रघुविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु आपली गाडी खराब झाली असल्यानं आपण ती रस्त्याच्या कडेला उभी केली होती असं स्पष्टीकरण रघुनं पोलिसांना दिलं.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/