नाराज घटकपक्षांच मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला चहापानाने उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या सेना- भाजप आमदारांच्या स्नेहभोजनाला चहापानाने युतीतल्या घटकपक्षांनी उत्तर दिले आहे. भाजपा -सेना युती झाल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सेना- भाजप आमदारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व हेवेदावे बाजूला सारून शिवसेना – भाजपने युतीची घोषणा केली. विशेष म्हणजे या युतीच्या घोषणेवेळी युतीतल्या घटकपक्षांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे घटकपक्ष नाराज आहेत. आणि याचदरम्यान, युती झाल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सेना- भाजप आमदारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .आणि विशेष म्हणजे या स्नेहभोजन कार्यक्रमात घटकपक्षांना आमंत्रितही केले नसल्याने घटकपक्ष आणखीनच नाराज झाले आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या सेना- भाजप आमदारांच्या स्नेहभोजनाला चहापानाने युतीतल्या घटकपक्षांनी उत्तर दिले.

विशेष म्हणजे, नाराज झालेल्या नेत्यांनी ‘वर्षा’लगतच असलेल्या रासप नेते आणि मंत्री महादेव जानकर यांच्या ‘मुक्तागिरी’ बंगल्यावर ‘चाय पे चर्चा’ केली आहे.यावेळी, रासप नेते आणि मंत्री महादेव जानकर , केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत. आदी नाराज नेते उपस्थित होते.