Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Unhealthy Habits | सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य (Health) आहे. आरोग्य चांगलं तर सर्व चांगलं असं म्हटलं जातं. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्याला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आपले शरीर देखील कमकुवत होते. विशेष म्हणजे माणसाच्या खाण्यापिण्यावर देखील आरोग्याच्या गोष्टी अवलंबून असतात. तरुण वयात आहाराकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे आरोग्य निरोगी राखण्यासाठी अनेक चुकीच्या सवयीपासून (Unhealthy Habits) दूर राहिले पाहिजे.

 

हिरव्या भाज्या न खाणे (Do Not Eat Greens) –

आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश न झाल्याने पोट आणि शरीराच्या अनेक समस्या जाणवू लागतात. त्याचबरोबर दररोज हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषक घटक देखील मिळतात. तर, ताज्या पालेभाज्या,  गाजर, टोमॅटो, कांदा इत्यादी पदार्थ रोज खाण्याने आरोग्य उत्तम राहते. (Unhealthy Habits)

 

जंक फूड खाणे (Eating Junk Food) –

सध्या धावपळीच्या युगात लोक पॅकेजड् आणि जंक फूड जास्त खात आहेत. त्यामुळे शरीरात साखर, ट्रान्स फॅट आणि सो़डियमचे प्रमाण वाढत आहे. या गोष्टीमुळे कॅन्सर, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान, संसर्गजन्य रोगांना कमकुवत रोगप्रतिकार शक्तीमुळे आपण लगेच बळी पडत असतो. तसेच, यासाठी सकस आहार खाण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

 

कामाच्या सवयी (Work Habits) –

कामाच्या सवयीमुळे देखील आरोग्यावर परिणाम होत असतो. दिवसभर बैठे काम, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने जीवनशैली बिघडत चालली आहे. खराब जीवनशैलीमुळे स्नायू आणि शरीराचे अवयव कमकुवत होतात. आणि मधुमेह, लठ्ठपणा, कमकुवत हाडे, स्ट्रोक, ह्रदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका वाढतो.

 

आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष (Ignoring Health Checks) –

डॉक्टर दर महिन्याला, दरवर्षी किंवा दोन-तीन वर्षांच्या अंतराने काही महत्त्वाच्या चाचण्या करण्याची शिफारस करतात. त्यामुळे कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार यासारखे मोठे आजार वेळेत ओळखून आवश्यक उपचार सुरू करता येतात. परंतु, कित्येक लोक या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करतात.

 

पुरेसी झोप न घेणे (Not Getting Enough Sleep) –

दररोज सात ते आठ तास चांगली झोप मिळणे आरोग्यासाठी चांगले असते.
नीट झोप होत नसल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.
अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाचे ठोके कमी-अधिक होणे,
उच्च रक्तदाब, निद्रानाश, तणाव, नैराश्य इत्यादी समस्या होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Unhealthy Habits | these 5 seemingly minor habits are detrimental to health serious illnesses occur in the future

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा