Unheard War Crime | गरोदर महिलांच्या शरीरात टाकले जात होते जीवघेणे Virus, जपानी लष्कराचे भयावह सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Unheard War Crime | युद्धात पुरूष, महिला आणि मुलांवर होणारे अत्याचार म्हणजे वॉर क्राईम (Unheard War Crime) बाबत खुप कमी लोकांना माहिती आहे. अशाच वॉर क्राईमबाबत आपण जाणून घेणार आहोत, जो जपानमध्ये करण्यात आला. युनिट 731 साठी जपानच्या लष्कराने जैविक शस्त्र (Biological weapons) बनवण्यास सुरूवात केली होती, जेणेकरून शत्रूवर वापर करता येऊ शकतो. याच्या सीक्रेट लॅब्जमध्ये माणसांच्या शरीरात धोकादायक व्हायरस आणि केमिकल टाकून प्रयोग केले जात असत. माणसाला या लॅबमध्ये अशा भयंकर यातना दिल्या जात की, कुणी विचारही करू शकत नाही.

महिलांसोबत केले जात असे राक्षसीकृत्य

Lieutenant General Shiro Ishii and his lab
महिला कैद्यांसोबत जपानी लष्कर जबरदस्तीने संबंध ठेवून त्यांना प्रेग्नंट करत असत. यानंतर गरोदर महिलांवर विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जात असे. इतकेच नव्हे, ते महिलांच्या शरीरात जीवघेणे व्हायरस सुद्धा सोडत असत, केवळ हे पाहण्यासाठी की त्या किती दिवस जिवंत राहू शकतात.

गुप्त युनिटचे दुर्मिळ छायाचित्र

Unit 731 Rare Pic
ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी दोन्हीवरील बॉम्ब हल्ल्यानंतर, सोव्हिएत लष्कराने मंचूरियावर हल्ला केला. या लढाईत जपानी लष्कर वाईटप्रकारे पराभूत झाले आणि युनिट 731 अधिकृतपणे भंग करण्यात आले होते. मात्र, या युनिटमध्ये करण्यात आलेले बहुतांश प्रयोग जाळण्यात आले होते. यासोबतच जपानने 13 वर्षाच्या रिसर्चमध्ये मिळवलेली सर्व माहिती सुद्धा नष्ट केली.

अनेस्थेशिया न देता केले होते प्रयोग
Prisoners to vivisection without anesthetic

त्यावेळी इजिप्तमध्ये एक जीवघेणा आजार पसरत होता, ज्याचे नाव होते सिफलिस.
जपानने या आजाराचा अभ्यास करण्यासाठी त्याचे जीवाणू कैद्यांच्या शरीरात टाकले होते.
हा आजार पसरण्यासाठी याद्वारे ग्रस्त कैद्यांना ते चीनच्या महिलांसोबत जबरदस्तीने शारीराक संबंधी ठेवायला सांगत असत.

ज्यांनी-ज्यांनी ऐकले ते हादरले

Prisoners were used for testing weapons including grenades
अशाच आणखी एका वेदनादायक प्रयोगाबाबत बोलायचे तर फ्रॉस्टबाईट टेस्टिंग नावाच्या या प्रयोगात मनुष्याचे हात-पाय अतिथंड पाण्यात बुडवले जात आणि ते जोपर्यंत कडक होत नाहीत तोपर्यंत पाणी थंड केले जात होते.
यानंतर बर्फासारखे झालेले हात-पाय गरम पाण्याने वितळवले जात होते,
जेणेकरून यावरून समजावे की वेगवेगळ्या तापमानाचा मानवी शरीर कोणता परिणाम होतो.

भयावह सत्य

Second Sino-Japanese War of World War II
चीनच्या पिंगफांगमधील युनिट 731 भयंकर प्रयोग करणारी ही एकमेव प्रयोगशाळा नव्हती.
तर चीनमध्ये तिच्या अनेक शाखा होत्या, ज्यामध्ये लिंकोउ (Branch 162), मुडनजियांग (Branch 643), सुनवु (Branch 673) आणि हॅलर (Branch 543) चा समावेश होता.
मात्र, दुसर्‍या महायुद्धानंतर भयंकर प्रयोग करण्याचे काम थांबले तेव्हा ही ठिकाणे निर्जन झाली.
आता तर यापैकी अनेक ठिकाणी लोक फिरायला येतात.
चीनी वेबसाइट Ecns wire नुसार,
मागील आठवड्यातच युनिट 731 चे ते भयावह अत्याचार दर्शवणारे एक प्रदर्शन लावण्यात आले होते.

Web Titel :- Unheard War Crime | japanese war crimes unit 731 that killed 3000 soldiers place where biological warfare conceived during world war 2

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त