COVID-19 नंतर ‘अम्फान’ पासून भारताला ‘धोका’, बांग्लादेशात 1.9 कोटी मुलं करतायेत ‘या’ धोक्याचा सामना : युनिसेफ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : युनिसेफने (युनिसेफ) असा इशारा दिला आहे की भारत आणि बांग्लादेशात ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे अचानक आलेल्या पूर आणि मुसळधार पावसामुळे किमान 1.9 कोटी मुलं धोक्याचा सामना करत आहेत. तसेच पश्चिम बंगाल थेट या वादळात अडकण्याची शक्यता आहे. बुधवारी पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांग्लादेशातील हटिया बेटच्या किनाऱ्यावर चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागात प्रचंड विनाश झाला आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे व विजेचे खांब कोसळले आहेत, तर कच्च्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतात तीन आणि बांग्लादेशात सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुलांवर याचा थेट परिणाम

संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) ने म्हटले आहे की, ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे भारत आणि बांग्लादेशातील किमान 1.9 कोटी मुलांना धोक्याचा सामना करावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1.6 कोटी मुलांसह पाच कोटीहून अधिक लोक पश्चिम बंगालमध्ये राहतात आणि त्यांच्यावर चक्रीवादळाचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोविड -19 मुळे अधिक धोका

युनिसेफने सांगितले की, कोविड -19 च्या कारणामुळे ‘अम्फान’ चक्रीवादळाचा लोकांवर अधिक परिणाम होण्याची भीती आहे. ज्यांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये पाठविण्यात आले आहे, तिथे देखील कोविड -19 आणि इतर संक्रमण पसरण्याचा अधिक धोका आहे. युनिसेफच्या दक्षिण आशिया प्रांताचे संचालक जीन गोह म्हणाले, ‘आम्ही परिस्थितीचे आकलन करत राहू.’ ते म्हणाले, ‘प्रभावित भागातील मुलांची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा ही प्राथमिकता आहे आणि कोविड -19 चा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योजना आखली आहे ही एक चांगली गोष्ट आहे.