‘पोलिओसारखंच संपूर्ण जगाला वाचवू शकते लस’; Unicef नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये लसीकरण मोहीमेची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. त्याबाबत आता यूनिसेफने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लशींच्या माध्यमातून आपण पोलिओसारखेच इतर दुसऱ्या व्हायरसपासून वाचण्यात मदत होऊ शकते.

यूनिसेफ इंडियाने ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट करून म्हटले, की पोलिओसारखेच इतर काही व्हायरसपासून वाचण्यासाठी मदत करत आहोत. गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत माणूस विविध जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी लशींची निर्मिती करत आहे. गेल्या शतकापूर्वी पोलिओ हा एक घातक आजार बनला होता. हा आजारही संपूर्ण जगभरात पसरला होता. त्यामुळे दरवर्षी हजारातील 100 लोक पॅरेलाईज होत होते. त्याचा प्रामुख्याने प्रभाव हा लहान मुलांवर पडत होता. तरुणही त्याच्या जाळ्यात अडकले होते.

1950 मध्ये पोलिओविरोधात दोन लशींची निर्मिती करण्यासाठी यश मिळाले आहे. तेव्हापासूनच सर्वदेशात जागतिक स्तरावर पोलिओविरोधात एकसाथ मिळून लढा देत आहोत. तेव्हापासून लहान मुलांना पोलिओचा डोस दिला जात आहे. याचमुळे लहान मुलांमध्ये निर्माण झालेल्या हर्ड इम्युनिटीमुळे पोलिओ नष्ट होत आहे. आता जवळपास संपूर्ण जगभरातून पोलिओ नष्ट झाला आहे.