‘या’ ठिकाणी लोकांना दिसली दुर्मिळ उडती ‘तबकडी’ ?

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – एलिअन्स आणि त्यांची तबकडी म्हणजे यूएफओ (अनआयडेंटिफाईड फ्लाईंट ऑब्जेक्ट) यांच्या असण्या आणि नसण्यावर अनेक लोकांनी प्रचंड दावे केले आहे. तसेच अनेक वैज्ञानिकांनी यावर वेगवेगळी मतं नोंदवली आहे. अनेक लोकांनी ही तबकडी आकाशात उडताना पहिल्याचा दावा ही केला आहे. पण या घटना किती सत्य आहे ? हे कोणालाच सांगता येणार नाही.
तसेच अलीकडेच दोन पायलटनीही विमानोड्डाण करीत असताना चमकदार वस्तू आकाशातून उडत असताना पाहिल्याचा दावा केला होता. या ‘यूएफओ’बाबतचे सत्य कधीही समोर आलेले नाही. हे कथित परग्रहवासी म्हणंजेच एलिअन्स अतिशय प्रगत असून ते या तबकडीतुन अनेक वेगवेगळ्या ग्रहांना भेट देत असतात. असे अनेकांचे म्हणणे आहे.आता एका गुगल मॅप यूजरने फ्लोरिडा स्वँप येथे ‘यूएफओ पाहिल्याचा दावा केला आहे.
ही कथित यूफो अंडाकृती असून ती रंगीबेरंगी आहे. ही ‘यूएफओ’ जिथे दिसली तेथून उत्तर अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगलचा भाग जवळच आहे. त्यामुळे याबातचे गूढ आणखी वाढले आहे. या ‘यूएफओ’  फोटोवरून अर्थातच चर्चेला ऊत आला. अनेकांनी ती ‘यूएफओ’ च असल्याचे ठासून सांगितले तर अनेकांनी ती वस्तू कुठली असू शकते, याबाबत कयास व्यक्‍त केले. एका यूजरने हे साधे फुलपाखरू असून, कॅमेरा ग्लिचमुळे ते असे दिसत असल्याचे म्हटले आहे.
अनेकदा चित्रपटामध्ये या एलिअन्स विषयी आपल्याला काल्पनिक गोष्टी  दाखवल्या जातात. तसेच माणसाला या विषयी पडलेले प्रश्न जसे एलिअन्स आहेत की नाही ? ते आहेत तर कुठे आहेत ?असेल तर ते कधी पृथ्वीवर आले होते का? अश्या अनेक प्रश्नांनी या गोष्टीचे गूढ आणि उत्सुकता दोन्ही वाढत जाते.