home page top 1

पुण्यातील रामटेकडी परिसरात गाड्यांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या रामटेकडी परिसरात अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक कांबळे यांच्या कार्यालायसासमोर पार्क केलेल्या चार रिक्षा, एक कार आणि एक टेम्पो या सहा वाहनांचा यात समावेश आहे. आज पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.

या प्रकारानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मात्र या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्याचा हा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like