खा. हेमा मालिनी पासून ते स्मृती इराणींपर्यंत ‘या’ ४ सेलिब्रिटींनी बजेटवर दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वात आज(शुक्रवार दि- ५ जुलै) अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. विशेष बाबी अशी की, निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्ण वेळ अर्थ मंत्री आहेत. अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर झाल्यानंतर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. काहींना बजेटमधील अनेक गोष्टींचे समर्थन केले आहे तर काहींनी काही गोष्टींचा विरोधही केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावर आपलं मत मांडलं आहे.

१) हेमा मालिनी- मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी मीडियाशी बोलताना बजेटवरील आपलं मत व्यक्त केलं आहे. हेमा मालिनी म्हणाल्या की, “मला खूप आनंद झाला आहे की, निर्मला सीतारमण अर्थ मंत्री झाल्या आहेत. एक महिला असून त्यांनी बजेट सादर केलं. चांगलं वाटलं. तिने खूप चांगल्या प्रकारे बजेट सादर केलं. नारीपासून नारायणी ही कंसेप्ट चागंली आहे. भारतात महिलांवर होणारे अत्याचार आणि हिंसा आता कमी होतील. लोकांना समजेल की, महिलांचा आदर करायला हवा. निर्मिलाने प्रत्येक क्षेत्रात चांगलं बजेट दिलं आहे. विरोधी पक्ष कधीच आमचं कौतुक करणार नाहीत. त्यांना जे म्हणायचं आहे ते तेच म्हणणार.”

२) मनोज तिवारी- भाजपाचे दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांनीही ट्विट करत बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज तिवारी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “जर पॅन कार्ड नंबर नसेल. तर आता आधार नंबरही चालेल. टॅक्स रिटर्न भरण्यासाठीही.” आणखी ट्विटमध्ये मनोज तिवारी म्हणतात, “आज लोकांना अनेक आशा-अपेक्षा आहेत. हे बजेट देशाला विश्वास देत आहे, त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत. हे बजेट विश्वास देत आहे की, दिशा बरोबर आहे, गती बरोबर आहे. त्यामुळे ध्येय गाठणं निश्चित आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी.”

३) रवी किशन- गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनीही बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, “मला असा विश्वास आहे की, हे बजेट भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या व्हिजनला साकार करण्याचा रोडमॅप तर देईलच, सोबतच हे बजेट सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या परिकल्पनेलाही साकार करण्याच्या दिशेकडे मजबूत पाऊल असणार आहे.”

 

४) स्मृती इराणी- महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही सोशल मीडियावर बजेटचं कौतुक केलं आहे. स्मृती इराणी यांनी लिहिलं आहे की, “मी पीएम मोदी आणि निर्मला सीतारमण यांना धन्यवाद देते. कारण त्यांनी प्रगतीशील, समावेशी, व्यावहारीक आणि भविष्यवादी बजेट सादर केलं आहे. हे बजेट सामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतच आहे सोबतच ते एका मजबूत अर्थव्यवस्थेचा पायाही आहे.”

https://twitter.com/smritiirani/status/1147068141303934976

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like