११.७५ लाख उत्पन्‍न असेल तरीही इन्कम टॅक्स भरण्याची नाही गरज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने अर्थसंकल्प मांडलानंतर चर्चा सुरु झाली. ती आयकर किती भरावा लागेल. परंतू आयकर स्लॅबमध्ये कोणाताही बदल करण्यात आली आहे. ५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतू त्या पेक्षा आधिक उत्पन्न असलेल्यांना मात्र मोदी सरकारने कोणाताही दिलासा दिलेला नाही. मध्यम वर्गीय यामुळे नाराज आहेत. परंतू जर तुमचे उत्पन्न ११.७५ लाख रुपयांपर्यंत असेल तरी तुम्हाला कर भरण्यापासून सुटका मिळू शकते.

अर्थमंत्र्यांनी कर दात्यांना घर आणि गाडी खरेदी केल्यास करात सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे ११.७५ लाख उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळू शकतो. म्हणजेच घर आणि गाडी घेऊन तुम्ही कर भरण्यापासून स्व:ताची सुटका करुन घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंतचा आपला कर वाचवू शकतात. त्यानंतर उरतात ६.७५ लाख रुपये. यातून वाचण्यासाठी तुम्ही ८० C मध्ये १.५० लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. याशिवाय ८० D मध्ये २५ हजार रुपये, गृह कर्जावर २ लाख रुपयांपर्यंतचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल.

इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर १.५० लाख रुपयांचा कर तुम्ही वाचवू शकतात. तर सरकारने स्वस्त घर खरेदीवर अतिरिक्त सूट १.५० लाख रुपये दिली आहे. अशा प्रकार एकूण गुंतवणूक ६.७५ लाख रुपये होईल. म्हणजेच टॅक्स लायबिलिटी झिरो.

जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपये पर्यंत असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. मोदी सरकारने ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना सूट देण्यात आली आहे.

तुमचे उत्पन्न असेल एवढेत तर भरावा लागेल एवढा कर –

जर तुमचे उत्पन्न ६ लाख रुपये असेल तर तुम्हाला ३२,५०० रुपये कर भरावा लागेल.
तर तुमचे उत्पन्न ७ लाख असेल तर तुम्हाला ५२,५०० रुपये कर भरावा लागेल.
८ लाख उत्पन्न असल्यास ७२,५०० रुपये कर भरावा लागेल.
तर ९ लाखाच्या उत्पन्नवर ९२,५०० रुपये कर भरावा लागेल.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like