Budget 2019 : भाड्यानं घर घेऊन राहणाऱ्यांसाठी खुशखबर ; येणार नवीन कायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागरिकांना घरांच्या संदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना पक्की घरे स्वस्तात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर भाड्याने घरात राहणाऱ्या नागरिकांची देखील काळजी सरकार घेणार असून त्यांच्यासाठी एक नवा कायदा आणणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी आज सांगितले. भाडेकरू आणि मालक यांचा विचार करुन हा नवीन कायदा तयार केला जाणार आहे. या नवीन कायद्यामध्ये घरमालकाच्या मनमानी कारभारावर बंधने घातली जाणार असून, भाडेवाढ इत्यादी सर्व समस्यांचा विचार केला जाणार आहे. या कायद्याद्वारे नवीन नियमावली देखील बनवली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचं घर देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील २०२१ पर्यंत १.९५ कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सर्वांना हक्काचं घर देण्यासाठी या आहेत तरतुदी आणि महत्त्वाच्या गोष्टी :
१. आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असून या घरांमध्ये या घरांमध्ये गॅस, विज आणि टॉयलेटची व्यवस्था असणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

२. ११४ दिवसांत आता एक घरं बांधलं जात असल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली.

३. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी २.६७ लाखांची सबसिडी सरकारच्या वतीनं आधीपासूनच देण्यात येत आहे.

४. ४५ लाख रुपयांपर्यंतच्या होम लोन वरील आयकराच्या सुटीची सीमा वाढून ती आता ३.५ लाख इतकी झाली आहे. याआधी हि सीमा २ लाख इतकी होती.

वजन कमी करायचंय मग ‘कच्ची केळी’ खा

‘हे’ माहित आहे का ? काही वाईट सवयी आरोग्यासाठी असतात चांगल्या

‘हे’ पदार्थ आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू

RSS आणि भाजपविरोधातील लढ्याचा जोश दहापटीने वाढेल

तथागत गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी