लोकांवर टॅक्सचं ओझं नको : सरन्यायाधीश बोबडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. आर्थिक मंदी असल्याने सादर होणाऱ्या बजेटमधून प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांना टॅक्स स्लॅबमध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांच्या या अपेक्षेला सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांची साथ मिळाली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले की नागरिकांवर टॅक्सचे ओझे टाकणे योग्य नाही. सरन्यायाधीशांनी इनकम टॅक्स ट्रिब्यूनलच्या 79 व्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ही मत व्यक्त केले.

एस.ए. बोबडे म्हणाले की टॅक्स चोरी करणं आर्थिक गुन्ह्यांबरोबर देशाच्या बाकी नागरिकांसह सामाजिक अन्याय देखील आहे. परंतु जर सरकार नागरिकांकडून अत्याधिक टॅक्स आकारत असेल तर सरकार स्वत: सामाजिक अन्याय करत आहे.

एस. ए. बोबडे म्हणाले की टॅक्स मधा सारखा काढून घेतला पाहिजे. फुलाचे नुकसान होता कामा नये. तसे न करत मध काढले पाहिजे. करदात्यांच्या शंकेचे तात्काळ निवारण झाले पाहिजे. जेणे करुन तो प्रोस्ताहित होईल. याशिवाय एक कुशल न्यायपालिका सुनिश्चित करावी, ते कराच्या प्रकरणात अडकून पडणार नाही.

एस. ए. बोबडे म्हणाले की देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आर्थिक मंदीच्या सावटा दरम्यान सादर होणारे हे बजेट अत्यंत महत्वाचे आहे. सरकार खर्च वाढवण्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. असे ही सांगितले जात आहे की महसूल वाढवण्यासाठी उपायांवर जोर दिला जात आहे.

यासह एस.ए. बोबडे म्हणाले की न्यायपालिकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापरावर जोद दिला. ते म्हणाले की न्यायपालिकेत टेक्नोलॉजीचा वापर महत्वाचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका निभावेल. असे अनेक क्षेत्र आहेत ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे कवर केले जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like