Budget 2020 : LIC चा IPO येणार, सरकार विकणार ‘भागिदारी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात LIC संबंधित मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगममधील हिस्सेदारी सरकार विकणार आहे. यासाठी सरकार इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आणेल. अर्थमंत्री म्हणाल्या की सरकार IPO द्वारा LIC मधील आपला शेअर हिस्सा विकणार आहे. सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकून पैसे जमा करेल.

LIC चा IPO येईल –
अर्थमंत्री निर्मला सितारमन 2020-21 अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या की सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी आयपीओद्वारे विकेल. सध्या भारतीय जीवन विमा निगममध्ये सरकारची 100 टक्के भागीदारी आहे. सरकार निर्गुंतवणूकीच्या धोरणांतर्गत एलआयसीमधून भागीदार विकेल.

1.05 लाख कोटी रुपये निर्गुंतवणूकीचे लक्ष –
सरकारने चालू अर्थिक वर्षात 1.05 लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक करण्याचे लक्ष ठेवले आहे. तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये निर्गुंतवणूकीचे लक्ष 2.1 लाख कोटी रुपये ठेवले आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात सरकार आतापर्यंत 18,094.59 कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केली आहे.

आयडीबीआय बँकेतील भागीदारी विकणार सरकार – सरकार आयडीबीआय बँकेतील आपली उरलेली भागीदारी विकण्याची तयारी करत आहे.