Budget 2019 : ‘सेस’ वाढीनंतर पेट्रोल, डिझेलचा भडका ; पेट्रोल २.५ तर डिझेल २.३ रुपयांनी महागले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी ५ जुलै रोजी निर्मला सीतारामन यांनी सादर केला. सीतारामन यांनी इंधनावरील कर वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. यानंतर पेट्रोलची किंमत २.५ रुपयांनी तर डिझेलची किंमत २.३ रुपयांनी वाढली. सीतारामन यांनी इंधनांवर २ रुपये प्रतिलिटर एक्साइज ड्यूटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेसमध्ये वाढ केली आहे. यांमुळे सरकारच्या तिजोरीत २८,००० कोटी भर पडेल.

इंधनाच्या बेस प्राईसवर केंद्राची एक्साइज ड्यूटी आणि सेस लावल्यानंतर VAT लागू होतो. यांमुळे पेट्रोलमध्ये २.५ आणि डिझेलमध्ये २.३ रुपये प्रतिलिटर वाढ होईल. शुक्रवारी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ७०.५१ रुपये आणि मुंबईत ७६.१५ रुपये आहे. तर दिल्लीमध्ये डिझेल ६४.३३ आणि मुंबईत ६७.४० रुपये प्रतिलिटर इतका भाव आहे.

याशिवाय सीतारामन यांनी कच्या तेलाच्या आयातीवर १ रुपये प्रतिटन आयात शुल्क देखील लावले आहे. भारत वर्षामध्ये २२ कोटी टन कच्या तेलाची आयात करतो. यानुसार सरकारला जवळपास २२ कोटी रुपये फायदा होईल.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात