मोदी सरकारनं 50 हजारापर्यंतच्या मुद्रा कर्जधारकांना दिला मोठा दिलासा, व्याजदरात मिळणार सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.24) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय महिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. प्रकाश जावडेकर म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळाने एक आध्यादेश काढाला आहे. अध्यादेशावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सहकारी बँका आरबीआयच्या देखरेखेखाली येणार आहेत.

याशिवाय 18 ते 20 कोटी लोकांना मुद्रा कर्ज मिळाले आहे. हा एक प्रकारे जगातील सर्वात मोठा लघु कर्ज प्रोग्राम आहे. या अंतर्गत 50 हजारांच्या कर्जाला शुशु लोन असे म्हटले जाते. 9 कोटी 37 लाख लोकांनी हे शिशु लोन घेतले आहे. असे कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्के व्याजाची सूट मिळणार असून हा नियम 1 जून 2020 पासून अंमलात येणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

जावेडकर म्हणाले की, कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका इत्यादी दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांना भारतात यायचे आहे. अशा लोकांना कुशीनगर विमानताळाचा मोठा फायदा होणार आहे. ए-वन आणि ए- थ्री ब्लॉक्समध्ये म्यानमारमध्ये गॅस संशोधन होणार असून उत्पादन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 909 कोटी रुपेय खर्च येणार असल्याची माहिती प्रकाश जावडेक यांनी दिली.