खुशखबर ! देशात प्रत्येकासाठी फ्री असणार कोरोना लस, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डॉ. हर्षवर्धन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना लसीसंदर्भात तयारी तीव्र करण्यात आली आहे. देशात आजपासून (2 जानेवारी) कोरोना लसीचे ड्राय रन सुरु झाले आहे. या दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाची ही लस केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात प्रत्येक भारतीयांना मोफत दिली जाईल. यासाठी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोविड -19 लसीचे ड्राय रन सुरु करीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन सिंह कोरोना लसीच्या ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात पोहोचले. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना लस केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरातील प्रत्येक भारतीयाला मोफत दिली जाईल. मी लोकांना आवाहन करतो की अफवांकडे दुर्लक्ष करू नका. लसीची सुरक्षा सुनिश्चित करणे, हे आमचे प्राधान्य आहे.