Union Home Minister Amit Shah | ‘उद्धव ठाकरेंनी धोका दिला, आता त्यांना जमीन दाखवा’, अमित शाह यांनी दंड थोपटले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) सध्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आहेत. त्यांनी सकाळी लालबागच्या राज्याचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai BJP President) आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दशर्न घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.

अमित शाह (Union Home Minister Amit Shah) म्हणाले, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करु नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर (Mumbai Politics) वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, अशा शब्दांत अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मध्ये पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचे सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती (Alliance) तोडली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
तुम्ही नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नावावर, देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले.
तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले.
मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे.
आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे शाह म्हणाले.

खरी शिवसेना शिंदेंचीच

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण दुसरीकडे, भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कोर्टात निकाल दिला आहे.
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आहे, असे शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title :- Union Home Minister Amit Shah | bjp will dominate mumbai politics says union home minister amit shah hit back shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला