‘मोबाईल अ‍ॅप’वरून होणार 2021 मध्ये देशाची 16 वी जनगणना, 12000 कोटी रूपये खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील जनगणना आता डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनगणना भवनाच्या कोनशिलेचे अनावरण केले तेव्हा ही महिती दिली. यावेळी अमित शाह म्हणाले की जनगणना आता ग्रीन पद्धतीने होणार आहे. भारतात ग्रीन बिल्डिंगच्या कॉन्सेप्टला स्विकारण्याची गरज आहे. नवी जणगणना या माध्यमातून करण्यात येईल. जनगणना देशाच्या भविष्यच्या विकासाची योजना बनवण्याचा आधार असते. यासाठी जनभागीदारी देखील गरजेची आहे. 1865 पासून आता पर्यंत 16 वी जनगणना होणार आहे. ते म्हणाले की नवे बदल आणि नव्या पद्धतीनंतर आता जनगणना डिजिटल होणार आहे.

अमित शाह म्हणाले की 2021 मध्ये जनगणना होईल. त्यात मोबाइल अ‍ॅपचा वापर होणार आहे. यात डिजिटल स्वरुपाचे आकडे उपलब्ध असतील. ते म्हणाले की जेवढ्या सहज जनगणना होईल, देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

गृहमंत्री म्हणाले की 2014 मध्ये मोदी सरकार आले तेव्हा पासून आपण विचार करण्यात बदल केला. येथूनच नव्या जनगणनेच्या नोंदणीच्या योग्य उपयोगाची सुरुवात झाली. याचे सर्वात मोठे उदाहरण उज्ज्वला योजना. यामाध्यमातून कळते की जसे 93 टक्के लोकांकडे गॅस नव्हता, तेव्हापासून डिजिटल पद्धतीने काम केल्यानंतर गॅस योग्य पद्धतीने मिळायला लागले.

अमित शाह यांनी सांगितले की आमच्या सरकार 22 योजनांचे रेखांकन जनगणनाच्या आधारे करत आहे. बेटी पढाव, बेटी बचाओ या योजना याच जनगणनाच्या आधारे काढल्या, ज्यावर योग्य ते काम करण्यात येत आहे. ते म्हणाले की जनगणनेला संपूर्ण बनवण्यासाठी 16 भाषांमध्ये ठेवण्यात येईल. ज्यात लोक आपली माहिती योग्य पद्धतीने भरु शकतील.

ते म्हणाले की डिजिटल जनगणना असल्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक कार्डसह सर्व कार्ड एकाच जागी असतील. ज्यामाध्यमातून सर्व काही योग्य पद्धतीने होईल. सध्या यावर अजून काम सुरु आहे. जनगणना डिजिटल झाल्याने काम सोपे होईल. शाह म्हणाले की सरकारने आतापर्यंतच्या जनगणनेवर जेवढा खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहे. जनगणनेवर सरकार आता जवळपास 12 हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे.

Visit – policenama.com