केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ‘कोरोना’ची लागण, राम मंदिराच्या भूमपूजनासाठी राहणार नाहीत उपस्थित

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं आहे. कोरेाना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

आपला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याबाबत अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोनाचे सुरूवातीचे काही लक्षण दिसल्यानंतर आपण स्वतः कोरोनाची टेस्ट केली होती. आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माझी प्रकृती ठीक आहे मात्र डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो असल्याचं ही त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसांपासुन आलेल्यांनी स्वतः आयसोलेट होवून स्वतःची तपासणी करून घ्यावं असं आवाहन देखील अमित शहा यांनी केलं आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी आयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अमित शहा उपस्थित राहणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.