केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती ‘पोलीस पदक’ जाहीर, महाराष्ट्रातील 54 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या 26 जानेवारी, देशात प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. एकूण 1040 पोलीस कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील 54 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारात महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. तर 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच 40 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर केले गेले.

शौर्य पदक जाहीर झालेले पोलीस कर्मचारी अधिकारी –
विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, मिठू जगदाळे, सुरपत वड्डे, अशिष हलामी, डॉ. एमव्हीसी माहेश्वर रेड्डी , समीर सिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम.

वरिष्ठ सेवा पदक –
अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहायक पोलीस आयुक्त), वसंत साबळे (सहा पोलीस निरीक्षक).

फेसबुक पेज लाईक करा –