वडील मुस्लिम अन् आई ख्रिश्चन, मग राहुल गांधी ब्राह्मण कसे ? : ‘या’ केंद्रीय मंत्र्याची घसरली जीभ

बेंगळुरू : वृत्तसंस्था – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले हेगडे या नव्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेडगे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हेडगे यांनी राहुल गांधींची जात काढली असून त्यांच्या ब्राह्मणत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कर्नाटकात एका सभेमध्ये बोलताना हेडगे यांनी राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जशा जवळ येत आहे तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. हेडगे म्हणाले की , ‘राहुल गांधी यांनी या देशाला ओळखलेले नाही. त्यांना या देशातील धर्माबाबत काहीही माहिती नाही. राहुल गांधी खोटे बोलत असून मुस्लिम वडील आणि ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो’, असा सवाल हेडगे यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी हेगडे यांनी एका सभेमध्ये ‘आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत’ असे वादग्रस्त विधान केले होते. कॉंग्रेससह सर्व विरोधी नेत्यांनी हेगडे यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर हेगडे यांनी लोकसभेत जाहीररीत्या माफी मागितली होती. ‘संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च असून त्यासंबंधी माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने मी दिलगिरी व्यक्त करत आहे’ अशा शब्दात हेगडे यांनी माफी मागितली होती. तसेच ‘जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका ‘असेही वादग्रस्त विधान हेगडे यांनी केले होते.

पर्रिकरांनंतर अमित शहांनीही साधला राहुल गांधींवर निशाणा
…तर रोज एक पंतप्रधान आणि रविवारी देश सुट्टीवर असेल : अमित शहा