राहुल गांधींकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का ?

बंगळुरु : वृत्तसंस्था – भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मागितले. मात्र त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मुस्लिम वडिल आणि ख्रिश्चन आई असलेल्या राहुल गांधीकडे हिंदू असल्याचा काही पुरावा आहे का ? राहुल गांधी स्वत: कशाच्या जिवावर जावेधारी हिंदू म्हणवतात ? असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले. ज्यानंतर भारताने १२ दिवसांनी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यामध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त झाले तसे २०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले असा दावा अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी केला. मात्र याचे पुरावे मागितले जाऊ लागले.

राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पुरावे द्या असं म्हटलं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी ही घणाघाती टीका केली आहे. कर्नाटकातील सिरसी या ठिकाणी झालेल्या एका संमेलनात हेगडे बोलत होते. राहुल गांधी हे हायब्रीड आहेत अशीही टीका त्यांनी केली.

ह्याहि बातम्या वाचा –

लोकसभेसोबत महाराष्ट्र विधासभेच्या एका जागेची पोटनिवडणूक

संजय काकडेंची व्याह्यांमार्फत मनधरणीचे भाजपकडून प्रयत्न

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मेगा ब्लॉक सलग ९ दिवस दिवसातून ५ वेळा मेगा ब्लॉक

राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य ; मसूद अझहरचा उल्लेख ‘मसूद अझहरजी’