सीतारामन यांच्यानंतर भाजपच्या आणखी एका मंत्र्याचं ‘कांद्या’वरुन वादग्रस्त ‘वक्तव्य’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांदा महागल्याने मोदी सरकारला घेरले जात आहे. त्यांचे मंत्री अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी एका मंत्र्याने कांद्यावर थक्क करेल असे वक्तव्य केले.

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी सांगितले की मी शाकाहारी आहे, मी कांदा कधी खाल्ला नाही. मला कांद्याच्या किंमतीबाबत काहीही माहित नाही, मग मी काय बोलू. याआधी कांद्याच्या किंमतीसंबंधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एक हैराण करणारे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, माझ्या घरात जास्त कांदा खाल्ला जात नाही. कांंदा 100 रुपये प्रति किलो पेक्षा महागला आहे. हैदराबादमध्ये कांदा 150 रुपयांवर पोहचला आहे.

कांद्याच्या वाढत असलेल्या किंमतीमुळे काँग्रेसने संसदेबाहेर आंदोलन देखील केले. या आंदोलनात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सहभागी झाले होते. संसदेत पोहचताच चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की अर्थव्यवस्थेबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे काँग्रेसने दिल्लीत जोरदार आंदोलन केले. या दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसात वाद देखील पाहायला मिळाला.