मोदींच्या सरकारमधील मंत्र्याचा अजब दावा, 15 मिनिटे उन्हात थांबल्याने नष्ट होतो ‘कोरोना’ व्हायरस (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 171 च्या वर पोहचला आहे. यासंदर्भात सर्वांनी 15 मिनिटे उन्हात उभे राहीले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमीन ‘डी’ मिळते. तसेच यामुळे कोणताही व्हायरस नष्ट होतो, असे देशाचे केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटले आहे.

संसद भवनातील कँटीन कॅशलेस करण्याची तयारी :
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी संसद भवन परिसरात असलेली कँटीन कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 31 मार्चपासून कॅश शिवाय कुणालाही काहीही खरेदी करता येणार नाही. त्यासाठी एसबीआयचे प्रीपेड कार्डदेखील तयार करण्यात येत आहे. या कार्डद्वारे कॅन्टीमधील नाष्टा, जेवण आदी घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली : 
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 47, आंध्र प्रेदश 2, दिल्ली 10, हरियाणा 17, कर्नाटक 14, केरळ 27, पंजाब 2, राजस्थान 7, तमिळनाडू 1, तेलंगणा 13, जम्मू-काश्मीर 1, लद्दाख -8, उत्तर प्रदेश 17, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.