मंत्र्याचा घराणेशाहीला विरोध, मुलाला तिकीट दिल्याने ‘यांनी’ दिला मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या मुलाला निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी अनेक नेते आग्रही असतात. त्यासाठी पक्षांतर करण्याचीही त्यांची तयारी असते. तर काही जण पक्षांतर करून मुलासाठी तिकीटही पदारत पाडून घेतात. मात्र, भाजपचे केंद्रीय मंत्री ब्रिजेंद्र सिंह आपल्या मुलाला तिकीट मिळाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. घराणेशाहीला विरोध म्हणून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र ब्रिजेंद्र सिंह यांना हरयाणामधून पक्षाने लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सुपुर्द केला आहे. बिरेंद्र सिंह म्हणाले की, भाजप घराणेशाहीच्या विरोधात आहे आणि निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित केला जातो. म्हणून जेव्हा माझ्या मुलाला पक्षाने तिकीट दिले आहे. त्यावर मी माझ्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सभासदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांना दिला आहे. तसेच आपण राजकारणातून निवृत्तीही घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

हरयाणाच्या हिसारमधून बिरेंद्र सिंह यांचे सुपुत्र ब्रिजेंद्र सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे. तर रोहतकमधून अरविंद शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1117337252558983168