केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धमेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनाही याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. धमेंद्र प्रधान यांनी आपली कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करुन सांगितले आहे.

कोविड-19 ची लक्षण दिसून आल्यानंतर मी माझी कोरोना टेस्ट करून घेतली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझी प्रकृती ठिक असल्याचे धमेंद्र प्रधान यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी स्वत:च ट्विटरवरू यासंदर्भात माहिती दिली. देशात अनेक राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता या यादित केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांचे नाव समाविष्ट झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने अमित शाह अयोध्या इथं होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. अमित शाह यांच्या प्रमाणे विविध राज्यांतील नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.