नवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा Corona second wave परिणाम आता अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकदम कमी झाला आहे. दिल्लीत सोमवारी केवळ 89 नवीन केस समोर आल्या आहेत ज्या 2021 मध्ये सर्वात कमी आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, देशाच्या अनेक दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची प्रकरणे रोखण्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. दरम्यान कोरोना व्हॅक्सीनेशन covid19 vaccine अभियान वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

देशात सोमवारी सुधारित गाईडलाईन लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त कोरोना व्हॅक्सीन डोस covid19 vaccine doses लोकांना देण्यात आले.
तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन Union Health Minister Harsh Vardhan, यांनी सायंकाळी 4 वाजता ट्विट करत दावा केला की,
जगातील सर्वात मोठा व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह पुढे आहे. व्हॅक्सीनेशन ड्राइव्हमध्ये Vaccination Drive सुधारित गाईडलाईन लागू झाल्यानंतर एका दिवसात विक्रमी 47 लाख कोविड व्हॅक्सीनचे डोस आतापर्यंत एका दिवसात दिले गेले.

यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी म्हटले की,
कोरोना व्हायरसचे रूप बदलणे आणि नागरिकांच्या चुकीमुळे कोरोनाची प्रकरणे वाढली आणि त्यांचे दुसर्‍या लाटेत रूपांतर झाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयात फ्रंट लाईन वर्करला Front line worker मास्क वितरित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

आरोग्य मंत्रालयाच्या Ministry of Health एका वक्तव्यानुसार, त्यांनी म्हटले की,
अजूनही हे पाऊल प्रतिकात्मक आहे परंतु विविध उद्योग आणि कॉर्पोरेट कुटुंबांतील लोक
आणि पदांवरील राजकीय नेते या पावलाचे अनुकरण करून एक चांगली साखळी तयार करू शकतात.
आणि कोविड अनुकूल आचरणाद्वारे प्रत्येकाला कोविड -19 (covid19) पासून वाचवण्यासाठी जनआंदोलन तयार करू शकतात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : union minister harsh vardhan says a record breaking 47 lakh covid19 vaccine doses administered so far on day one 

हे देखील वाचा

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

LPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही