Coronavirus संकटात मोठा दिलासा ! ईश्यान्यकडील 8 पैकी 5 राज्ये ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सोमवारी एक दिलासा देणारी बातमी समोर आला आहे. इशान्येकडील 8 पैकी 5 राज्या कोरोनामुक्त झाली आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ईशान्येकडील 8 पैकी 5 राज्ये पूर्णपणे कोरोना विषाणूपासून मुक्त झाली आहेत. उर्वरित तीन राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

जितेंद्र सिंह हे पूर्वोत्तर प्रदेशाचे विकास मंत्री आहेत. त्यांनी पर्वोत्तर परिषद, शिलांगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह तसेच विविध सरकारी संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जितेंद्र सिंह म्हणाले, ईशान्येकडील पाच राज्यातील सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा हे ही पाच राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. तर आसाम मेघालय आणि मिझोरम मध्ये अनुक्रमे 8,11 आणि 1 अशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

केंद्राकडून राज्यांचे अभिनंदन
जितेंद्र सिंह म्हणाले की, हे सर्व रुग्ण बरे झाले असून रविवारी रात्रीपासून कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नाही. त्यांनी क्षेत्रातील राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आपल्या मंत्रलयातील अधिकारी आणि समिती यांनी योग्य प्रकारे समन्वय साधून कोरोनाचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.