Photos : केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये Entry ! सौंदर्याच्या बाबतीत देतेय बड्या अभिनेत्रींना ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आता आणखी एका मंत्र्याची मुलगी बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. असं सांगितलं जात आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक ही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. एका युद्धपटातून ती बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे.

मंत्री रमेश पोखरियाल यांच्या जवळच्यांनी आरुषीच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. भारतीय सैन्यातील 6 धाडसी महिला अधिकाऱ्यांच्या पराक्रमावर आधारीत एका युद्धपटातून आरुषी बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात करणार आहे. यामध्ये तिच्या सोबत प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, कीर्ति कुल्हारी यांच्यासह आणखी दोन ॲक्ट्रेस असतील.

उरी द सर्जिक स्ट्राईकचे डायरेक्टर आदित्य धर यांच्याशी या सिनेमाच्या डायरेक्शनबद्दल बातचित झाल्याचं सांगितलं जात आहे. असंही समजत आहे की, आरुषी या सिनेमापूर्वी एका म्युझिक अल्बममध्येही दिसणार आहे. तिनं टी सीरिजसाठी रोहित सुचंती सोबत एका म्युझिक अल्बम शुट केला आहे. टी सीरिज लवकरच याची घोषणा करणार आहे. खुद्द आरुषीनंच याबाबत माहिती दिली आहे. इतकंच नाही तर आरुषीच्या सिनेमाबद्दलही टी सीरिजनं खुलासा केला आहे.