Union Minister Nitin Gadkari | “मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणेच काम करेन”, नितीन गडकरींनी केले स्पष्ट

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) भारतीय जनता पक्षात (BJP) अस्वस्थ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना गडकरींनी मात्र, मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणेच काम करणार. याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे असे म्हणत नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खरं तर, काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती (Central Election Committee) आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून (BJP Parliamentary Board) नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते.
त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच नितीन गडकरी यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असेल, तर त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करावा, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नुकतचं केलं.
या सर्व घडामोडींवर नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) स्वयंसेवक आहे.
मी माझ्या विचारांसाठी राजकारणात आलो.
त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे.
पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे.
त्यामुळे मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे.

काँग्रेसने दिलेल्या ऑफरवर जरी गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी, भाजपाच्या केंद्रातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे काही सुनवायचे नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Web Title :- Union Minister Nitin Gadkari | bjp leader and union minister nitin gadkari statement on offer to join congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला येण्यासाठी 250 रुपयांचं वाटप? ऑडिओ क्लिप व्हायरल

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मित्रावर कोयत्याने वार, पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील घटना